आठवणींच्या लहरी
तुझ्या येण्याने उल्हसित होऊन,
मी (मनात) ते इमले बांधले
तुझ्या खळखळ हसण्याचे,
स्मृती पटलावर वाळूत चित्र रेखिले.
झंझावाता प्रमाणे तू आलीस,
तुटून गेले ते इमले
पुसून गेल्या त्या चित्ररेखा,
आणि आता ओहोटी सुरु झाली,
तुझ्या जाण्याने, माझ्या स्मृतीपटलावर,
ना आता आहेत इमले, ना आहेत रेखाटने,
सुन्न होऊनी मी मात्र किनारी उभा आहे,
ना कोरडा राहू इच्छितो, अन ना ओले होता येते