चौरस्ता
धुक्यात हरवली वाट,
काळोखात गुरफटली रात्र,
पाऊल वाटेवरून,
रान हिरवे,
ते सृष्टी सौंदर्य,
कळत असून, कळत नव्हते,
दुरून डोंगर साजरे ।
पाऊलवाट संपवून,
रस्त्याला लागलो,
नव्हते कोणी साथी,
अन नाही वाटाडे…
आशेवर मी असेल का
या वाटेला माझं गाव ।
उन्हे कलुनी,
संध्या छाया,
पोहोचलो चौरस्ता
नीती, उन्नती, सदाचार अन उदरनिर्वाह
चार रस्ते चार दिशेला,
कुठे असेल माझं गाव ।
सांगू शकेल का कोणी,
चारी रस्ते मिळणारे गाव कुठे असेल
रात्र काळोखात गुरफटत होती,
अन वाट धुक्यात हरवत होती ।