दवबिंदू असावे
स्फटिककणांच्या थेंबाइतुके
अणुरेणूहून सुक्ष्म असावे
सहज विरळ ते बाष्फ गोठूनी
तृणाक्षा वर दव बिंदू विसावे
त्या उमलत्या कळीच्या कोमलगालांवरी
क्षणनिवांत विसावून जावे
वा तरु तणांच्या मुकुटावरती
हिरेमाणके विराज व्हावे
ऊन कोवळे अंगील्यावे
जे आपुले ते देऊन जावे
क्षणभंगुर जीवन हे
असेच हवेत विरून जावे.