Back

धारातीर्थी सैनिकाची व्यथा

करुणव्यथा जाणुनी घ्या
क्षणभरी माझ्या हृदयाची
पंख पसरले डोळे थिजले,
आता मी क्षणांचा सोबती

मी जाता माझी
आठवण काय राहील
क्षणभर जन ढाळतील अशृ इथे,
अन विसरतील ही वाट ।

कोंडलेल्या भावनांचा
बांध हा फुटला पहा
अनुभवाचे बोल हे,
जन बांधवा ऐकशील का ?

आजवर ना केली विनंती,
ना केली कसली आशा
मातृभूमीच्या प्रेमासाठी,
क्षण एका बलिदान करा
हीच एकुलती आशा

धरुनी लढलो होतो मी
मातृभक्ती, बंधुप्रेम अन रक्षाबंदी होतो मी
विसरलात जरी मज चालेल,
पण विसरू नका कर्तव्य
दीप जरी ना इथे पेटला,
तळपू द्या मातृभूमीला.