दुरावा
मिठीत येता वाढे स्पंदन, हवी हवीशी का ही हूर हूर
दाटून येतो कंठ अन, पापण्या मग होती ओलसर
हरवणार हे क्षण आता अन, सैर भैर मन बावरले
भीती अनामिक, स्पर्श आता ते दूरावणारे
का असे ते गाव तुझे हे, माझ्या विश्वाहून दूर दूर ।
सुटली मिठी अन तुटले बंधन, निसटले क्षण अन हरवले स्पंदन
विश्वातील पोकळी माझ्या मर्मात जाणवी
नको नको ती रात्र एकटी, दूर दूर ते विश्व तुझे ते
मन ओथंबले येत आठवणी, धावून जाशी मना कुठवरी
आठवणींचे ते सारे क्षण, हुर हुरणारे ते स्पंदन
साठवणीचे रांजण माझे, रिक्त जाहले जर हे प्याले
येशील का रे स्वप्नी माझ्या, दोन ध्रुवतील अंतर कापून ।