Back

गुरु राया (भजन)

श्वास हा ची माय, बाकी सारी माया
वाट आता दाखवा हो, देवा गुरु राया ।।

संसारी फिरुनी, झाली क्षीण काया
सारी सुख शांती, तुझ्या चरणाला ।
श्वास हा ची माय, बाकी सारी माया
वाट आता दाखवा हो, देवा गुरु राया ।।

सोडवी मिठी “मी” पणाची ,मिळाया हो गती
पाहाया विश्वरूप, झाली मती कोती ।
श्वास हा ची माय, बाकी सारी माया
वाट आता दाखवा हो, देवा गुरु राया ।।

नाम तुझे मुखी, रूप ते लोचनी
हृदयी अवतरले, निर्गुण निराकारा
म्हणे कांत आता, दाव तूंचि वाट
आलो तुझीया द्वारी, देवा गुरु राया ।।
श्वास हा ची माय, बाकी सारी माया
वाट आता दाखवा हो , देवा गुरु राया ।।