हॅपी न्यू इयर
हॅपी न्यू इयर
उगीच माणूस नवीन वर्षाची,
आशा बाळगून असतो.
आजचा दिवस उद्याच्या पेक्षा,
फार काही वेगळा नसतो ।
नवीन वर्षाच्या नवीन संकल्पना,
महिना भर घोळवत ठेवतो
नव्या वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात,
सर्व काही विसरून जातो ।
मागील वर्ष कसे होते, तसे जरा ठीकच होते.
नवीन वर्ष मात्र आपल्याला,
फारच चांगले जावे वाटते ।
शेवटच्या दिवशी पार्टी करताना,
हेच आम्हा कळत नाही
गेल्या सरल्या का, येणाऱ्या साठी,
आम्ही रात्र धुंदीत काढी ।
म्हणतात ना माणूस खरा
आशावादी असतो
आजच्या पेक्षा उद्याचीच जास्त चिंता करत असतो ।