हरवले गवसले
बकुळीची फुले हि सारि बरसली माझ्या आंगणात
ना वेचिलीं मी ओंजळीत, नाजुक सुगंधी बरसात
कोमल हळुवार स्पर्श, चुरतील पाकळ्या नाजुक
वेचिला मी गंध त्यांचा, नाहुन त्या सुगंधात
वेचले अन जमविले किती सारे मार्गा मधे
ओवले अन जोडीले ते, नात्यांच्या धाग्या मधे
सुटले बंधन अन विखुरले, माणिक वेचिता सारे
एक एकला मी गुंफू कसे हे सर्व पसारे
क्षणचित्रं गोंदलेली ह्या पटलावरी,
त्या स्मृतींची का होत आहे विस्मृती
ओंजळीत क्षण हे हिरे माणिकांचे,
काही निखळले, हरवले, अन विखुरले
क्षण एकच हा (सद्) भाग्याचा,
चिमटीत राहिला आहे ।