Back

जखम

काढू नकोस खपली , आहे जखम अजूनही ओली
तो घाव खूप खोलवर , झाला आहे मनावर …

घुसळत बाण शब्दांचे , हृदयास पार भेदूनि
ते रक्त छातीत ओकलेले , पोटात रिचवले मी

काढू नकोस खपली, आहे जखम अजूनही ओली
तो घाव खूप खोलवर, झाला आहे मनावर …

विसरून सर्व काही, झाकून भावनांना
आता कुठे मनाला ,थोडाच शांत विसावा

काढू नकोस खपली, आहे जखम अजूनही ओली
तो घाव खूप खोलवर, झाला आहे मनावर …

तेंव्हाच अवचित आलीस ,घेऊन अश्रूंच्या माळा
वचने पुन्हा जूनीच , फिरुनी खेळ मांडाया

काढू नकोस खपली, आहे जखम अजूनही ओली
तो घाव खूप खोलवर, झाला आहे मनावर …