Back

लपंडाव

लपंडाव

माझी सावली माझ्यापासून दूरदूर जात आहे
माझी सावली माझ्याशीच लपंडाव खेळात आहे.

रोज सकाळपासून रात्रीपर्यंत

अनेक खाचखळग्यातून, धडपडत, माझी वाटचाल सुरु आहे.
माझ्या निश्चयाचे महामेरू, रोजच पोखरले जात आहेत,
माझ्या स्वाभिमानी मनाचे ,हे जग ठिकऱ्या करू पाहत आहे.
माणूस असून यंत्रसारखी धडधडकरत ,घड्याळाच्या तालावर,
सतत धावपळ करत ,रेसच्या घोड्याप्रमाणे अधिक तेज धावत,

माझी वाटचाल सुरु आहे.

आणि आतातर ,माझी सावली देखील खूप पुढे निघून गेलीआहे.

माझी सावली माझ्याशीच लपंडाव खेळात आहे.