Back

मूर्तिकार

का असा वेडा मी,
वळणावरी थांबलो
रात्र संपुनि प्रकाशाची,
वाट का मी पाहतो ?

ध्रुव तारा का दिसेना,
चंद्र हा झाकाळलेला
माझ्या मनावर सावलीचे,
नभ मेघांनी दाटले का?

पथ्थराच्या मुर्ति नां घडविणारा,
शिल्पकार हा मीच ना
आज वि श्वासू देवावर ?
नि दैववारी मी विसंबूंच का?

मूर्ति ही असो पथ्थराची,
मृत्तिकेची वा जीवनाची
पण आज हे घडवेची ना,
हात का थरकपाती ?