Back

निर्माते

ह्या विश्वात
नवं निर्माते फक्त चार
भूतलावरील बाकी सर्व कामगार ।

प्रथम वंदितो त्या मातेला
जिने निर्मीयले नवं जीवाला
सोसून कळा अन जीव पोसला
वाढिवले या जीव जगा ।

नतमस्तक झुकते मग बळीराजासी
अपार कष्ट, मेहनत अन आशावादी
कधी पूर तर कधी दुष्काळ, पण प्रयत्नवादी
पिकवितो धान्याच्या राशी, पण स्वतः उपाशी ।

तदनंतर मी नमतो, शिक्षक शोधकांसी
अथक परिश्रम, पुनः पुन्हा ते प्रयत्नशील
शोधिती नवनव्या वाटा अन घडवती
नवं कल्पना, नवं विचारांनी घडवती, नवं पिढी ।

वंदितो शेवटी सर्व कला, कवी, साहित्यिक
नवनिर्मितीचा ध्यास घेऊनि देती नवं आकार
नवं विचारधारा, नाविन्याचे आविष्कार
मिळून देती या जगाला दूरदृष्टीचे विचार ।

नवनिर्माते ते चार, राहिले या जगी उपेक्षित
का माणसा हे असे, पांग फेडीसी वागून तुछित ।