Back

पारिजात

पारिजात हा वेचू किती मी
भरली ओंजळ, सडा अजूनही
मंद सुवासिक, नाजूक, कोमल
रंगसंगती अद्वितीय, पण जीवन सीमित

देव्हाऱ्यात सजावती
हलकासा तो सुगंध दरवळे
कुठे साठवून ठेवावे हे
का सांजवेळी हे सुकावे

उत्तर मजला सापडले ते
स्पर्श, दृष्टीने ते अनुभवावे
देवे दिजले आज क्षणांचे
मनी मानसा संचित व्हावे

पारिजात हा वेचू किती मी
भरली ओंजळ, सडा अजूनही
उद्या पहाटे पुनश्च बहरूनी
सडा पडतसे पुन्हा अंगणी