परतफेड / समर्पण
रोप लाविले इवलेसे, खतपाणी दिले त्यास
गोंजारून मायेने मग वृक्ष कसा उभारला
उन्हं पावसा मग आधार देई, पथिका तो.
फळे मिळे का लावणाऱ्यास, हा खचितच योग.
सागराच्या वाफांनाही, कवेत घेऊन,
डोंगरमाथी बरसला ढग
वाहणारे ओढे आता नदीला ते देती
नदी देते सागराला, समर्पण…
घेणे आहे अन, देणे ही आहे,
पण “घेणे- देणे” नाही