प्रयोजन (purpose)
जगण्याची धडपड समजत नाही
जीवनाची आशा संपत नाही
मनाची घालमेल उमजत नाही
तरीही जगतात…
का? कशासाठी?
जीवनाची मृत्यूशी सांगड जमत नाही
जगतात तरी कर्माची सांगता उरत नाही
मृत्यू तर अटळ आहे,
म्हणून कोणी थांबत नाही
का जगावे? कोणी ? कसे ?
हे कुणाला कळलेच नाही
संत साधूंच्या जगण्यात
समाधान असते म्हणे
पण शेवटी प्रश्नचिन्ह हे
अन अधूरेपण असे
जनसामान्य जगती
रोजची, रोजमेळित ही
मृत्यूपर्यंत जगले खरे,
का? कसे? कोणास ठाऊक?