रानफुलं
आखिव रेखिव नितांत सुंदर
रंग उधळशी प्रसन्न चित्ते
मंद मंद सुगंध ही दरवळशी
का लपलासी रानफुला तू
रान कपारी ओढ्या काठी ।
एकलाच तू, ना सवंगडी
ना प्रशंसक , ना बघणारी
क्षणभंगुर ते जीवन आणिक
मुरझणार तू उद्या सकाळी ।
ये मज संगे, तू बाजारी
सजवशील तू राज मुकुटा वा
गुच्छ , हार वा तोरण सजवा
कवे घेतील, अबला, सबला ।
{फुलाचे मनोगत}
का सजवू मी ती फुलदाणी
नको गुच्छ अन सजावटी
क्षणभंगुर हे फुलणे माझे
अर्पण ज्याचे त्याच्या चरणीं ।