सहज
सहज हसावे, सहज रडावे
सहज सुखावे, सहज दुःखिया
सहज जगावे सहज जगी या
सहज सहज होऊनी जावे
सहज जशी ती कळी उमलते
सहज कसा तो गंध दरवळे
सहज ऊन पावसाच्या खेळी
हळूच कसे ते इंद्रधनुष्य प्रकटते
सहज गुंतावे कोषा मध्ये
होऊन फुलपाखरू प्रकटावे
सहज फिरावे भृंगा सम ते
बंधनात कमलदली सुखावे
सहज जगावे सहज जगी या
सहज सहज होऊनी जावे