Back

शून्य

शून्य

प्रत्येकास येथे मरण आहे

तू इथे शाश्वत नाहीस,
काय केले, काय मिळवले
शेवटी उरलेच काय वेड्या
राख पण नाही तुझी ।

कोठुनी आला, अन जाणार कोठे
जगणार कसे अन जाणार केंव्हा
काहीच तू जाणित नाहीस ।

धाव धावसी जन्म गेला
काही मिळवण्या अन जग भटकण्या,
का खुशीने वेडावला तू
बांधुनी महाल अन राजवाडे
समजले का ? उमजले का ?
हे विश्व कोणी बांधले ! ।

घे भरारी, भेदूनि घे कृष्ण विवर हे अंतरीचे
डोकावसी या अंतरी तू , अनंताचे विश्व आहे
भेदता त्या अंतराला ,शोधता त्या शाश्वताला
जाणून घे ते , फक्त एक “शून्य” आहे ।