Back

उदास मन

उदास व्हावे,
उदास गावें,
उदासीन रस कोळून प्यावे
नदी किनारी,
मीच एकटा,
पाणी झुळझुळ वाहे ।

शांती मनाला, शांती तनाला,
अशी शांतता, परी उदासीनता
अशातही निरव संध्या,
उदासीनतेतच… मग बुडून जावे ।

तन ही ढळेना,
मन ही वळेना,
माझे मी पण हरवून गेले

उदास वेळी,
उदास स्वर हे,
उदास आलाप छेडीत राहावे
उदास रस पीत पीत मग
रात्रीला त्या मिठीत घ्यावे ।