उत्सव
या तरुणांना तुम्हीं असे म्हातारे करू नका
स्थूल होताहेत बच्चे कंपनी अशी तक्रार करू नका
होळी आणि रंग पंचमी आम्ही घरीच साजरी करतो,
बाहेर रंग खेळण्या पेक्षा, पुरण पोळीवर ताव मारतो
मंगळागौरीला आता खेळ फुगडी होत नाही,
साधेपणे आम्ही गौरी पुजून, पक्वान्नावर ताव मारतो
गणपती येतात घरी, आम्ही साधेपणेच स्वागत करतो,
ढोल ताशा मिरवणूक नाही, पण लाडू मोदकांवर ताव मारतो
दिवाळीला आताशा आम्ही पहाटे उठतच नाही,
किल्ले फटाके नकोत म्हणून, आम्ही काहीच करत नाही
एक कंदील चार पणत्या, साधेपणेच साजरे करतो,
फराळ अन खरेदी, ह्यालाच उत्सव म्हणून साजरा करतो
या तरुणांना तुम्हीं असे म्हातारे करू नका,
सळसळत्या तरुणाईला कृतीचे गुलाल उधळू द्या,
अन उत्सवा मध्ये उत्साहाचे वारे वाहू द्या