- मनी स्फुटले
- सहज उमटले
- मनी वावटळ, उधाण झाले
- लिहिल्या असतील शब्दांच्या ओळी
- कधी जुळले यमक
- तर कधी चारोळी
- जे सुचले ते कधी वेळी अवेळी
- मनात सुचले ते पानांवर
- लिहिले काही
- असे मनोगत...
- "कविता पानो पानी"
- तू रात्र ..
- तू पहाट ..
- तू मनात ..
- तू जीवनात ..
- पावसांच्या थेंबात ...
- सकाळच्या कोवळ्या उन्हात ...
- पक्षांच्या चिवचिवटात ...
- मनात, हृदयात ,स्वप्नात ...
- पानांवर रेखाटलेली ...
- "कविता पानोपानी"
जर तुम्हाला माझ्या कविता आवडल्या असतील तर मला नक्की मेल करा.